fbpx

लोकसभा लढणार का ?, वाचा काय म्हणाले विजयसिंह मोहिते पाटील

टीम महाराष्ट्र देशा: माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून संजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मागील दोन दिवसांपासून विजयसिंह मोहिते पाटील हेच भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विजयसिंह यांनी मात्र आपण लोकसभा लढणार नसून जो उमेदवार भाजपकडून दिला जाईल, त्या उमेदवाराला विजयी करणार असल्याचं सांगितले आहे.

रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशाने माढा लोकसभा मतदारसंघात तिढा निर्माण झाला आहे. मोहिते पाटील यांनी ऐनवेळी भाजपमध्ये जाण्याची भूमिका घेतली, त्यामुळे राष्ट्रवादीने भाजपच्या पाठींब्यावर जि प अध्यक्ष झालेले संजय शिंदे यांना पक्षात घेत उमेदवारी दिली. तर भाजपला अद्याप उमेदवाराचे नाव निश्चित करता आलेले नाही. रणजितसिंह मोहिते पाटील, सातारचे रणजितसिंह निंबाळकर तसेच सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख यांचे नाव उमेदवारीसाठी चर्चिले जात आहे.

मागील दोन दिवसांपासून विजयदादांनाच उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र या सर्व चर्चेच खंडन करत विजयसिंह मोहिते पाटील यांनी ‘आपण भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही, ते मला उमेदवारी देतील हे सांगता येत नाही. माझ्यासाठी उमेदवारीपेक्षा कृष्णा- भीमा स्थितीकरण महत्वाचे आहे. माढ्यासाठी भाजप जो उमेदवार देईल त्याचा प्रचार करून निवडून आणू, असे सांगितले आहे.