मोहिते-पाटलांचा होणार पत्ता कट?

कुर्डूवाडी/हर्षल बागल- राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून आगामी लोकसभेला राष्ट्रवादीकडून प्रभाकर देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरू असून विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा सध्या जिल्हाभर सुरू आहे.

सोलापूर जिल्हातील माढा लोकसभा मतदासंघाने या देशाला अनेक बडे नेते दिले. खा शरद पवार , मंत्री रामदास आठवले , यांची नावे समोर येतील . मागील 2014 च्या लोकसभेला मोदी लाटेत माढा मतदारसंघ मोहिते-पाटील यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या एकनिष्टपणामुळे वाचवण्यात यश आले. आगामी लोकसभेला खा. विजयसिंह मोहिते पाटिल यांनी पुन्हा तिकीट मागितले तर गेल्या वर्षभरापासुन माढा मतदार संघात नविन सुशिक्षीत प्रशासनातील स्वच्छ सेवानिवृत्त चेहरा म्हणजे माजी आयुक्त प्रभाकर देशमुख , कुर्डूवाडी येथुन प्रशासकिय सेवेला सुरवात केल्यानंतर पदोन्नती होत थेट आयुक्त पदापर्यंत गेलेले अधिकारी व दुष्काळाशी चार हात करणारा योध्दा म्हणुन प्रभाकर देशमुख साहेबांची चांगली चर्ची राष्ट्रवादीच्या गोठ्यात होताना दिसत आहे. पक्षपातळीवर याची चाचपणी होतानाही संकेत मिळत आहेत.

माढा मतदार संघातील सोलापुर व सातारा जिल्ह्यातील अनेक गावे आहेत. माण खटाव तालुक्यात एकहाती वर्चस्व असलेले देशमुख यांचे पारडे जड दिसत आहे राष्ट्रवादीच्या मुंबई येथे झालेल्या पहिल्या मुलाखतीला विद्यमान खा. विजयसिंह मोहिते-पाटिल यांनी पक्षश्रेष्ठींपुढे तिकीट मागितले. तर याच बैठकिला मोहिते पाटिल यांना कुणी विरोधही केला नाही व कोणी समर्थनही केल नाही हि विशेष बाब आहे. त्याच बैठकिला खा. शरद पवार यांना माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दुष्काळावर केलेल्या कामाचा पाढा वाचत लोकसभेला माढ्यातुन ऊमेदवारी मागितली आहे.

माण खटाव तालुक्यात देशमुख यांनी जलयुक्त शिवार , वाँटरकप स्पर्धेत आपल्या लोकसहभागातुन मोठे योगदान दिले . अन माण खटाव तालुके दुष्काळी तालुके ही ओळख पुसण्यात मदत केली आहे. जलयुक्त , वाँटरकप स्पर्धा, जलसधांरणा कामात देशमुख यांनी सर्वत्र आघाडी घेतली आहे. हे काम पाहुन मध्यंतरी खा. शरद पवार यांनी दुष्काळासाठी लढत असलेल्या देशमुख यांच्या कार्याला सातारा जिल्हा बँकेकडुन एक कोटीची मदत दिली. यावरुन शरद पवार अन देशमुख यांचे घनिष्ठ संबध सर्वांच्या लक्षात येतील.

खा. विजयसिंह मोहिते पाटिल यांच्याकडुन झालेली साखरकारखान्यांची अवस्था हा कळीचा मुद्दा निवडणुकीत विरोधक ऊचलुन धरु शकतात. तसेच मध्यंतरीच्या काळात मोहितेपाटिल भाजपाच्या वाटेवर अशाही काही बातम्या येत राहिल्या याचा पक्ष पातळीवर विचार केल्यास मोहिते पाटिल यांना डावलुन जर प्रभाकर देशमुख यांना राष्ट्रवादीने ऊमेदवारी दिल्यास हा मोठा धक्का मोहिते पाटिल यांना बसु शकतो. कदाचित प्रभाकर देशमुख यांना तिकीट देऊन मोहिते पाटिल यांचे पुनर्वसन देखील राष्ट्रवादी करण्याचा प्रयत्न करेल असे संकेत मिळत आहेत.

खा. शरद पवार अन प्रभाकर देशमुख यांचे निकटचे सबंध आहेत. तसेच गेल्या काही वर्षापासुन सोलापुर जिल्ह्यात मोहिते पाटिल व संजय शिंदे यांच्यातील हाडवैरपणामुळे सोलापुर जिल्हा परिषदेची अनेक वर्षापासुनची सत्ता राष्ट्रवादी पक्षाला गमवावी लागली. याची मोठी सल शरद पवारांच्या मनात असली तर तिकीट देताना याचा विचार केला जाऊ शकतो. सोलापुर जिल्ह्यात एक काळ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणुन ओळख होती. पण अलीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बंडखोरीमुळे अन गद्दारीमुळे राष्ट्रवादी चे वजन पुर्णतहा कमी झालेले दिसुन येते.

प्रभाकर देशमुख यांना कोणताही डाग नाही
प्रभाकर देशमुख यांना राजकारणात येण्यापुर्वी प्रशासनात कोणताही डाग नाही. ऊच्चशिक्षीत , स्वच्छ चेहरा , दुष्काळावर मोठे काम ,शरद पवारांचे निकटवर्तीय , पक्ष वाढिसाठी गुप्त प्रयत्न अशी देशमुखांची बाजु आँलक्लेअर आहे.

करमाळ्यातील राष्ट्रवादी मोहिते-पाटिल मोहिते पाटिल यांच्या मागे ऊभा राहिल का ?
गत लोकसभेला मोहिते पाटिल यांना करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाने भरभरुन मते दिली पण विधानसभेला मोहिते पाटिल यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यांच्या विरोधात जाऊन ऊघडपणे शिवसेनेचे ऊमेदवार नारायण पाटिल यांना मदत केली . हा मुद्दा अजुनही करमाळ्याच्या नेत्या रश्मी बागल यांचे समर्थक विसरलेले नसल्यामुळे करमाळ्यातील 60 हजार बागल गटाची राष्ट्रवादीची मते यावेळेस मोहिते पाटिल यांना साथ देतील का असा प्रश्न आहे. ?

जि.प.अध्यक्ष संजय शिंदे यांची भुमिका निर्णायक ठरणार
सोलापुर जिल्हा परिषदेवर मोहिते पाटिल यांच्यावर एकतर्फी मात करित अध्यक्ष होत सत्ता निर्माण करणारे संजय शिंदे यांची करमाळा तालुक्यात 55 हजार मते एक गठ्याने आहेत. यंदा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर माढा तालुक्यात 70-80 हजार मतांची गोळाबेरीज आहे. मोहिते पाटिल व शिंदे जानी दुश्मनी तर महाराष्ट्राला माहित आहे. संजय शिंदे यांनी गतनिवडणुकित लोकसभेला तटस्थ भुमिका घेतली होती. पण यंदा मात्र ते ऊघडपणे मोहिते पाटिल यांना विरोध करताना दिसत आहेत. प्रभाकर देशमुख यांना ऊमेदवारी दिल्यास संजय शिंदे तटस्थ राहणार असे संकेत दिले आहेत. तर मोहिते पाटिल यांना ऊमेदवारी दिल्यास दिड लाख मतांचे मालक असलेले संजय शिंदे लोकसभेला राजकिय भुकंप घडवुन आणणार हे भाकित केले जात आहे.

संजय शिंदेना आमदार करणे हेच माझे ध्येय : चंद्रकांत सरडे 

उदयनराजे की श्रीनिवास पाटील,साताऱ्याचा उमेदवार आज पवार ठरणार

माझ्या नावाची उगाचच चर्चा करू नका,पवारांची राष्ट्रवादीच्या नेत्यांना तंबी