मोठी बातमी : अखेर विजयसिंह मोहिते पाटील भाजपच्या मंचावर, मोदींच्या हस्ते जाहीर सत्कार

टीम महाराष्ट्र देशा: माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी याची जाहीर सभा पार पडत आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार असणारे विजयसिंह मोहिते पाटील हे देखील मंचावर उपस्थित आहेत, त्यामुळे विजयदादांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे.

रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील हे देखील भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती, मात्र विजयदादांनी भाजप प्रवेश न करता भाजपला सहकार्याची भूमिका घेतली होती. अखेर आज त्यांनी अकलूजमध्ये आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्टेजवर उपस्थित लावली आहे.

यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विजयसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार करण्यात आला आहे.