‘आरएसएस’ची कहाणी आता पडद्यावर, सिनेमासाठी भाजप देणार १०० कोटी रुपये

RSS movies poster

टीम महाराष्ट्र देशा-नेहमी चर्चेत असणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी चर्चा आहे तीसंघावरील सिनेमाची. या सिनेमाच्या माध्यमातून संघाची स्थापना, आजपर्यंतच्या वाटचालीत आलेल्या अडचणी, अनेक मुद्द्यांवर असणाऱ्या संघाच्या भूमिका उलगडणार आहेत.

अतिशय भव्यदिव्य अशाप्रकारचा हा सिनेमा बनविण्याची तयारी सुरु झाली असून भाजपने या सिनेमाच्या निर्मितीचा खर्च उचलण्याची तयारी दाखवली आहे.  सुमारे १०० कोटी रुपयांचा हा प्रोजेक्ट असणार आहे.विशेष म्हणजे बहुबालीसह अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांच्या कथा लिहणारे लेखक विजयेंद्र प्रसाद हे या सिनेमाचं लेखन करणार आहेत.

दै. लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, विजयेंद्र प्रसाद लवकरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास दाखवणारी कथा लिहिणार आहे. सिनेमात आरएसएसची स्थापना कशी झाली इथपासून ते आतापर्यंतचा त्यांचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. भाजपने या सिनेमाच्या निर्मितीचा खर्च उचलण्याची तयारी दाखवली असून सुमारे १०० कोटी रुपयांचा हा प्रोजेक्ट असणार आहे.