‘विजयदादा’ बोलायला उभे राहिले आणि बोलू न देता ‘अजितदादांनी घेतला माईक ताब्यात

टीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा काही दिवसांपूर्वी फलटण येथून पुढे गेली. या फलटणच्या सभेत माढा लोकसभेचे विद्यमान खासदार ‘विजयदादा’ बोलायला उभे राहिले, आणि त्यावेळेस दादांना बोलू न देता अजित पवारांनी स्वतः माईक ताब्यात घेतला आणि बोलायला सुरुवात केली. त्यामुळे समोर असलेल्या गर्दीमध्ये याची वेगळीच चर्चा रंगली.

Loading...

विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे थोरले साहेब बारामतीकर यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे कदाचित धाकटे दादा बारामतीकर यांनी दादा बोलायला उठू लागले तेव्हा लगेचच माईक ताब्यात घेतला. दादांनी बोलूच नये अशीच सुप्त इच्छा कदाचित धाकटे दादा बारामतीकर यांची असेल, म्हणूनच दादांनी माईक ताब्यात घेतला. याची चर्चा मात्र गर्दीमध्ये रंगली

त्यानंतर यांना त्याच सभेत मतदारसंघातील मतदारांचे आभार मानण्यासाठी पद्धतशीरपणे पुढं करण्यात आले. त्यामुळे पुन्हा नवीनच चर्चा सुरु झाली. त्यामुळे आता माढा लोकसभेचे तिकीट दादांना मिळणार की देशमुखांना मिळणार याबबत प्रश्न चिन्ह उभा राहिले.

या सगळ्यामुळे मात्र फलटणच्या सभेत प्रभाकर देशमुखांचे कार्येकर्ते मात्र कमालीचे उत्साही दिसले. विद्यमान खासदाराला बोलायला उठल्यावर दादांनी माईक घेणे, याच सभेत देशमुखांचा स्टेजवरील वावर यामुळे फलटणच्या सभेत देशमुखांची चलती होती हे मात्र नक्की.Loading…


Loading…

Loading...