या निकालाने असा गुन्हा करण्याची कोणाची हिम्मत होणार नाही-विजया रहाटकर

टीम महाराष्ट्र देशा: संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील तिन्ही दोषींना नगरच्या सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. कोपर्डी प्रकरणात न्यायालयाने तिन्ही नराधमांना सुनावलेल्या शिक्षेवर महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी समाधान व्यक्त केल आहे. या कठोर शिक्षेमुळे वाईट प्रवृत्तींवर जरब तर बसेलच पण अशा प्रकारे गुन्हा करण्याची कोणाची परत हिम्मत होणार नाही अस मत देखील रहाटकर यांनी व्यक्त केलं. या खटल्यामुळे कायद्याच राज्य निर्माण होईल आणि लोकांचा कायद्यावरील विश्वास सुद्धा अजून दृढ होईल अस देखील रहाटकर म्हणाल्या आहेत.Loading…


Loading…

Loading...