उदयनराजे-संभाजीराजे भेटीवर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया म्हणाले, ओबीसी समाजासाठी…

vijay vadettiwar

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. खासदार संभाजी छत्रपती यांनी ६ जून रोजी रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या १६ जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या संदर्भात खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजी छत्रपती यांची बहुप्रतिक्षीत भेट काही दिवसांपूर्वी उदयनराजे यांच्या आधीच ठरलेल्या काही कार्यक्रमांमुळे होऊ शकली नव्हती. त्यामुळे राज्यभरात उलट-सुलट चर्चांना उधाण आले होते. अखेर, आज ( १४ जून ) पुण्यात हे दोन्ही राजे भेटले आहेत. या भेटीकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष्य लागलं होतं. या भेटीनंतर दोन्ही राजे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि इतर समस्या सोडवण्यासाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

आता या भेटीवर विविध नेते प्रतिक्रिया देत आहेत. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या भेटीचं स्वागत करतानाच ओबीसी समाजाच्या मदतीसाठी देखील साद घातली आहे. ‘मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही राजे एकत्र आले याचा आम्हाला आनंदच आहे. कुठल्याही समाजाला न्याय मिळालाच पाहिजे. पण राजेंनी ओबीसींसाठीही प्रयत्न केले पाहिजे. राजे हे सर्वांचे अर्थात सर्व समाजाचे असतात,’ असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

IMP