fbpx

अखेर विजय वड्डेटीवार यांची विरोधीपक्ष नेतेपदी निवड, मुख्यमंत्र्यांची धूर्त खेळीही यशस्वी

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा विरोधी पक्षनेते पदी अखेर कॉंग्रसचे विजय वड्डेटीवार यांची वर्णी लागली आहे, कॉंग्रेसला विरोधी पक्षनेते पद देताना भाजप – शिवसेनेच्या पारड्यात विधान परिषद उपसभापती पद पाडून घेण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले आहेत.

एका बाजूला विधानसभेत वड्डेटीवार यांची विरोधी पक्ष नेतेपदी वर्णी लागली असताना दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे. गोऱ्हे यांचा अर्ज दाखल करतेवेळी मंत्री विनोद तावडे, दिवाकर रावते, महादेव जानकर उपस्थित होते.

नुकतेच भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याने कॉंग्रेसकडून वड्डेटीवार यांना संधी देण्यात आली, मात्र कॉंग्रेसला विरोधी पक्षनेते पद हवे असल्यास विधानपरिषदेचे उपसभापती पद युतीला सोडण्याची अट घालण्यात आली होती.