देवेंद्र फडणवीस राज्यातील जनतेची दिशाभूल करत आहे; वडेट्टीवार यांचा आरोप

vijay

मुंबई : काल फडणवीसांनी पत्रकार परिषदेत मोदी सरकारनं महाराष्ट्राला कशी मदत केली याची आकडेवारी दिली होती. महाविकास आघाडीचे नेत्यांनी फडणवीसांच्या आकडेवारीवर प्रश्न उपस्थित करत टीका केली आहे.

याच पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील देखील टीकास्त्र सोडलं आहे. फडणवीस हे राज्यातील जनतेची दिशाभूल करत असल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. ते याबाबत चंद्रपूर येथे बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘कोरोनासाठी केंद्र सरकारने एक छदामही वेगळा दिला नाही. जो निधी दिला, तो दरवर्षी जो नियमितपणे दिला जातो, तोच आहे. त्यामुळे फडणवीस हे राज्यातील जनतेची दिशाभूल करत आहे,’ असं वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रक प्रसिद्ध करून फडणवीसांच्या आकडेवारीतील फोलपणा दाखवून दिला आहे. ‘केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमध्ये विविध घटकांना कर्ज रुपाने रक्कम देण्याची तयारी दाखवली आहे. पण त्यामध्ये अनेक शर्थी आहेत. जो त्या अटी-शर्थी पूर्ण करेल व ज्याची कर्ज परतफेड करण्याची क्षमता असेल, त्यालाच ते कर्ज मिळू शकेल,’ असं चव्हाण म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या 

#coronavirus : देशात गेल्या २४ तासात ६३८७ नवे रुग्ण

लघु उद्योगांवरील व्याजाचे ओझे हलके करण्याचा प्रयत्न केला जाईल – सुभाष देसाई