कोल्हापूर:- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक झालेला दिसतोय, मात्र दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार याच मुद्द्यावर वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत. ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांना घेऊन जालन्यात, महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोर्चादरम्यान त्यांनी गायकवाड आयोगाचा मागासवर्गाचा अहवाल विश्वासार्ह नाही, असे वक्तव्य केले होते. वेडट्टीवार यांच्या याच विधानामुळे मराठा समाजात त्यांच्याविरोधात असंतोष निर्माण झाला आहे.
दरम्यान, बहुजन कल्याण विकासमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला मराठा भूषण पुरस्कार देऊन जाहीर सत्कार केला जाईल, अशी घोषणा सकल मराठा समाज या संघटनेने केली आहे. या घोषणेची अधिकृत माहिती सचिन तोडकर यांनी दिली दिली. तसेच, समस्त मराठा समाजाने वडेट्टीवार यांच्या तोंडाला काळं फासण्याचे आवाहनही त्यांनी केले.
आज सकल मराठा समाजाने कोल्हापुरातील दसरा चौकामध्ये आंदोलन केले. यावेळी त्यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते सचिन तोडकर यांनी मंत्री वडेट्टीवार यांच्या चेहऱ्याला जो कोणी काळ फासेल त्या व्यक्तीचा कोल्हापुरातील मराठा समाज, मराठा भूषण पुरस्कार देऊन जाहीर सत्कार करेल असं सांगितल.
महत्वाच्या बातम्या
- अर्थसंकल्पात घेण्यात येणार ‘राष्ट्रीय बँक’ स्थापनेचा निर्णय !
- जिल्हा नियोजन समितीच्या सन 2021-22 साठी 520.78 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी
- शेतकरी आंदोलन चिघळले; पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आंदोलकर्त्यांनी उपसल्या तलवारी!
- ‘शेतकरी मोर्चाला पब्लिसिटी स्टंट म्हणत शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या आठवलेंनी माफी मागावी’
- प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली निघणे, हे फार दुर्दैवी आहे; मुश्रीफांची केंद्र सरकारवर टीका