गोंदिया: मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांच्यावर आज भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी टीका केली. वडेट्टीवारांनी टक्केवारासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाची ‘फुकटं घावलं आणि गाव सारं धावलं’, अशी अवस्था केल्याची टीका पडळकरांनी केली होती. हे ओबीसी मंत्री जिथे भेटतील, तिथे त्यांना गाठा आणि जाब विचारा, असे आवाहन देखील पडळकरांनी केले.
यावर आता विजय वडेट्टीवार यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. आज गोंदिया प्रचारसभेसाठी आल्यावर वडेट्टीवार बोलत होते. ज्या मानसावर लूटमारी, फसवणूक, शेती ढापने, एट्रोसिटी सारखे गुन्हे दाखल आहेत, त्या व्यक्तिच्या वक्तव्यावर बोलने चुकीचे ठरेल असे मत वड्डेट्टीवार यांनी मांडले. पुढे बोलताना वडेट्टीवार म्हणाले, मागास आयोग ही स्वायंत्त संस्था असून आम्ही त्यांच्या खात्यात 5 कोटी रुपये टाकले आहेत. त्यांनी त्याचा वापर कसा करावा हे त्यांनी ठरवावे असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
गोपीचंद पडळकर टीका करताना म्हणाले होते, ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार व अर्थमंत्री अजित पवार यांनी नुसती वाहवा मिळवत मागासवर्ग आयोगासाठी ४५० कोटींची घोषणा केली. वास्तवात फक्त साडेचार कोटी दिले. वडेट्टीवारांनी टक्केवारीसाठी ‘फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं’ अशी राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था केल्याची टीका त्यांनी केली. पडळकरांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना वडेट्टीवार म्हणाले, पडळकर नया नया पंछी असून नया नया पंछी ज्यादा फड़फड़ करता है, असे म्हणत विजय वडेट्टीवारांनी पडळकरांचा समाचार घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
औरंगाबादेत मोकाट जनावरांचा सुळसुळाट; महापालिकेची ‘ती’ घोषणा हवेतच विरली!
-
‘ही शिवसेना नव्हे, ही तर काँग्रेस सेना’; रवी रणांचा शिवसेनेवर हल्ला
-
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी परवानगी कशाला हवी? नवनीत राणांचा हल्लाबोल
-
औरंगाबाद प्राणीसंग्रहालयात बछड्यांसाठी जागा नाही; म्हणे आता प्रजननच रोखा!
-
‘दुगाण्या झाडायला काय अक्कल लागते?’; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला