पंकजा मुंडेंचा गेम भाजप नेत्यांनीचं केला, ‘या’ ज्येष्ठ नेत्याने केला घणाघाती आरोप

टीम महाराष्ट्र देशा : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर पक्षातील नेत्यांनीच गेम केला, मात्र आता पंकजा मुंडे गेम केलेल्यांवर योग्य नेम धरणार आहेत, असे वक्तव्य कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चांगलीचं चर्चा माजली आहे. . पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये पुढे काय करायचं ? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? या सर्व बाबींचा सर्वांगाने विचार करून येत्या १२ डिसेंबरला आपल्यासमोर येणार आहे, असे लिहिले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना सुरवात झाले आहे. तर मुंडे १२ तारखेला काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

यावरच बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, पंकजा मुंडे यांच्याशी विधानसभा निवडणुकीत राजकारण झालं. भाजपमध्ये काहीच गोलमाल नसतं तर भाजप मधील दोन नेते असलेले पंकजा मुंडे कुठे जाणार नाहीत हे सांगण्याची वेळ आली नसती. बहुजनांना डावलू शकत नाही सत्ता चालवू शकत नाही हे पंकजा मुंडे दाखवून देतील असंही ते म्हणाले.

दरम्यान दरम्यान पंकजा मुंडे या भाजप पक्ष सोडणार असल्याच्या वृत्ताचे भाजपकडून खंडन करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक विशेष पत्रकार परिषद घेत पंकजा मुंडे भाजप सोडणार नसून त्या पक्षातचं राहणार आहेत, अशी माहिती दिली आहे. त्यामुळे मुंडे पक्षांतर करणार असल्याच्या केवळ अफवा आहेत, असे पाटील म्हणाले आहेत. तर शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनीही पंकजा मुंडे यांच्याबाबत सूचक विधान केले होते. पंकजा मुंडेच काय तर राज्यातील अनेक नेते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची प्रतिक्रिया खा. संजय राऊत यांनी दिली आहे. पंकजा मुंडेंचा निर्णय 12 तारखेलाचं कळेलही असेही ते म्हणाले आहे.

महत्वाच्या बातम्या

Loading...