fbpx

आता बारामतीच्या टग्याचे नटबोल्टचंं ढिले करतो – शिवतारे

vijay shivtare & ajit pawar

पुणे: बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारसभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यामध्ये सुरू झालेला कलगीतुरा अद्याप कायम आहे, बारामती येथील सभेत बोलताना विजय शिवतारे आता कसे आमदार होतात हे बघतोच, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. पवार यांच्या टिकेनंतर शिवतारे देखील आक्रमक झाले आहेत.

आपण इंजिनिअर असून नट बोल्ड कसे आवळायचे आणि ढिल्ले करायचे हे येत, त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बारामतीच्या टग्याचे सगळे नट बोल्ट ढिल्ले करणार, अशी टीका विजय शिवतारे यांनी केली आहे. शिरूर लोकसभेचे शिवसेना उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शिवतारे बोलत होते.

दरम्यान, पवार कुटुंबियांना इतिहासात कधीही नव्हता एवढा विरोध  होऊ लागल्याने अजित पवारांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. फक्त अजित पवारचं नव्हे तर संपूर्ण पवार कुटुंबियांचा मानसिक समतोल ढासळला आहे. लोकशाहीमध्ये जनता ठरवते आमदार कोण होणार आणि कोण नाही होणार ते. अजित पवार नव्हे तर मी आमदार होणार कि नाही ते पुरंदर तालुक्यातील स्वाभिमानी जनता ठरवेल. असा पलटवार शिवतारे यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता.