fbpx

विजय शिवतारे यांचे सुप्रिया सुळेंविरोधात लढण्यासाठी तयार असल्याचे संकेत

टीम महाराष्ट्र देशा : २०१४ मध्ये जलसंपदा राज्यमंत्री शिवसेना नेते विजय शिवतारे बारामती लोकसभा मतदार संघातून खा.सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लढण्यास इच्छुक होते. मात्र, त्यावेळेस भाजपने मित्रपक्ष असलेल्या रासपचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी उमेदेवारी दिली होती. आता पुन्हा एकदा शिवतारे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा सुळे यांच्याविरोधात लढण्यास इच्छुक असल्याचे संकेत मिळाले आहे.

बारामती मतदार संघात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि जलसंपदा राज्यमंत्री शिवसेना नेते विजय शिवतारे यांचे वैर राज्याने २०१ ४च्या लोकसभा निवडणुकीत पाहिले आहे. आता तोच संघर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा समोर येत आहे. योद्धा नेहमी तलवार काढून असतो, तो फक्त आदेशाची वाट पाहत असतो, असे म्हणत विजय शिवतारे यांनी सुप्रिया सुळेंविरोधात लढण्यासाठी तयार असल्याचे सूचक वक्तव्य केले आहे.

दरम्यान, २०१४ साली शिवतारे-सुळे संघर्ष अवघ्या राज्याने पाहिला होता. यंदा देखील शिवतारे यांनी पुन्हा एकदा सुप्रिया सुळेंविरोधात एकप्रकारे रणशिंग फुंकले असल्याने,शिवतारे यांना मतदारसंघातून यावर्षी तरी संधी मिळेल का हा सवाल उपस्थित होत आहे.