मानसिक संतुलन ढासळल्याने अजित पवार उद्धटपणाची वक्तव्य करत आहेत : विजय शिवतारे

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यातील मतदानाला आता अवघे काही तास उरले आहेत. तत्पूर्वी काल सायंकाळी तिसऱ्या टप्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. पण प्रचाराच्या सांगता सभांमधून मात्र सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार टोलेबाजी झाली आहे. रविवारी बारामतीत झालेल्या राष्ट्रवादीच्या सांगता सभेमध्ये अजित पवार यांनी पुरंदरचे आमदार विजय शिवतारे हे पुन्हा कसे आमदार होतात, तेच बघतो असे धमकी वजा वक्तव्य केले होते. तर यावर आता राज्यमंत्री शिवतारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कोणाला आमदार किंवा खासदार करायचे, हे सुज्ञ जनता ठरवत असते. त्यामुळे मी असल्या धमक्यांना भिक घालत नाही असे शिवतारे म्हणाले आहेत. ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना शिवतारे यांनी प्रतिक्रिया दिली.

Loading...

यावेळी शिवतारे म्हणाले की, मी आमदार होणार कि नाही हे ठरवणारे अजित पवार कोण आहेत. बारामतीमध्ये आतापर्यंत जनता त्यांना साहेब-साहेब म्हणत होती पण आता जनता त्यांच्या विरोधात जात आहे. त्यामुळे अजित पवार यांचे मानसिक संतुलन ढासळले असून ते आता उद्धटपणाचे वक्तव्य करत आहेत. परंतु मी मात्र अशा धमक्यांना भिक घालत नाही असे शिवतारे यावेळी म्हणाले. तर या निवडणुकीत अजित पवार यांची घमेंड जनताचं घालवणार, असा घणाघात देखील त्यांनी केला.

पुढे शिवतारे म्हणाले की, पवार कुटुंबियांना इतिहासात कधीही नव्हता एवढा विरोध आता होऊ लागल्याने अजित पवारांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. फक्त अजित पवारचं नव्हे तर संपूर्ण पवार कुटुंबियांचा मानसिक समतोल ढासळला आहे. लोकशाहीमध्ये जनता ठरवते आमदार कोण होणार आणि कोण नाही होणार ते. अजित पवार नव्हे तर मी आमदार होणार कि नाही ते पुरंदर तालुक्यातील स्वाभिमानी जनता ठरवेल. असा पलटवार शिवतारे यांनी यावेळी केला आहे.Loading…


Loading…

Loading...