fbpx

वडीलांच्या नावाचा किती दिवस फायदा घेणार विजय शिवतारेंचा सुप्रिया सुळेंना खडा सवाल

टीम महाराष्ट्र देशा : बारामती मतदार संघात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि जलसंपदा राज्यमंत्री शिवसेना नेते विजय शिवतारे यांचे वैर राज्याने २०१४च्या लोकसभा निवडणुकीत पाहिले आहे. आता तोच संघर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा समोर येत आहे. पवार यांच्या विरोधात राज्यात लाट आहे. कोणताही उमेदवार असेल तरी सुप्रिया सुळे यांचा पराभव अटळ असल्याचा दावा विजय शिवतारे यांनी केला आहे. तर सुप्रिया सुळे यांचे कर्तुत्व काय ? वडीलांच्या नावावर किती दिवस फायदा घेणार अशी जहरी टीका देखील विजय शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली आहे.

दरम्यान, २०१४ मध्ये विजय शिवतारे बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लढण्यास इच्छुक होते. मात्र, त्यावेळेस भाजपने मित्रपक्ष असलेल्या रासपचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी उमेदेवारी दिली होती. तेव्हा ही लढत अत्यंत चुरशीची झाली होती. यंदा देखील शिवतारे यांनी पुन्हा एकदा सुप्रिया सुळेंविरोधात रणशिंग फुंकले असल्याने, आता बारामती लोकसभा मतदार संघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.