‘अजित पवार नव्हे तर मी आमदार होणार कि नाही ते पुरंदरची स्वाभिमानी जनता ठरवेल’

टीम महाराष्ट्र देशा : सध्या देशभरात निवडणुकांचे जोरदार वाहत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर टीका करण्यात कोणतीच कसर ठेवत नाहीत. अशातचं राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनी विजय शिवतारे यांच्यातील चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. शिवतारे यांच्यावर निशाणा साधताना अजित पवारांनी थेट अरेरावीची भाषा केली असून शिवतारे यांनी देखील आपल्या खास शैलीत पलटवार केला आहे.

‘विजय शिवतारे आता पोपटासाराखा बोलायला लागलाय. शिवतारे… तू यंदा कसा आमदार होतो तेच बघतो’ असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. ते बारामतीत घेतलेल्या सभेत बोलत होते. तर ‘महाराष्ट्र देशा’ बरोबर बोलताना शिवतारे यांनी अजित पवारांचे मानसिक संतुलन ढासळले असल्याचा टोला लगावला आहे.

काय म्हणाले अजित पवार ?

राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सांगता सभा बारामतीत पार पडली. यावेळी विजय शिवतारे यांच्यावर टीका करत अजित पवार म्हणाले की, शिवतारे… तू यंदा कसा आमदार होतो तेच बघतो, असा इशाराच राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनी शिवतारेंना दिला आहे. अजित पवारने एकदा ठरवलं की एखाद्याला नाहीच आमदार होऊन द्यायचं… तर तो नाहीचं आमदार होत…

शिवतारेंचा घणाघात

पवार कुटुंबियांना इतिहासात कधीही नव्हता एवढा विरोध आता होऊ लागल्याने अजित पवारांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. फक्त अजित पवारचंं नव्हे तर संपूर्ण पवार कुटुंबियांचा मानसिक तोल ढासळला आहे. लोकशाहीमध्ये जनता ठरवते आमदार कोण होणार आणि कोण नाही होणार ते. अजित पवार नव्हे तर मी आमदार होणार कि नाही ते पुरंदर तालुक्यातील स्वाभिमानी जनता ठरवेल.Loading…
Loading...