मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचा धनुष्यबाण गोठवला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशातच माजी मंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
विजय शिवतारे यांचा शरद पवार यांच्यावर आरोप –
शिवसेना पक्ष शरद पवारांना संपवायचा होता, सगळा दोष त्यांचा आहे, यातून त्यांना स्वतःचा फायदा करून घ्यायचा होता, त्यामुळे शरद पवारच शिवसेना संपवायला जबाबदार आहेत, असं विजय शिवतारे म्हणाले. दोन दिवसांपुर्वी शरद पवारांनी वक्तव्य केलं होतं, यावेळी जो निर्णय होईल त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे, ही मोठी लोकं कधी गेम करतील काय सांगता येत नाही, असं देखील शिवतारे म्हणाले.
पवार साहेबांना शिवसेना – भाजपचा संसार बघवत नव्हता –
पवार साहेबांना शिवसेना – भाजपचा संसार बघवत नव्हता, पवार यांनी कधीच शिवसेनेशी मिळवून घेतलं नाही, पवार यांची मैत्री हिंदूह्रदयसम्राट यांच्याशी असला तरी राजकीय मतभेद होते, मात्र, 2014 पासून शरद पवार यांचा प्लॅन शिवसेना संपवण्याचा होता, हे शरद पवार यांचं कटकारस्थान आहे आणि त्यांच्या नादी लागून उद्धव ठाकरे यांनी पक्ष संपवला आहे, असा आरोप शिवतारेंनी केला आहे.
दरम्यान, राज्याच्या राजकरणातलं शरद पवार हे बर्मोडा ट्रँगल आहेत, त्यांच्या जवळ गेलेले सगळे संपतात, आज पर्यंतचा इतिहास फघडून बघा, शरद पवार यांच्या जवळ गेलेले सर्व पक्ष संपले, असा दावा देखील शिवतारेंनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Apple iPhone 14 Plus | Apple iPhone 14 Plus वर सुरू आहेत बंपर एक्सचेंज ऑफर
- Supriya Sule | “हम बेवफा तो हर गीज नही थे, पर…”, सुप्रिया सुळेंचा एकनाथ शिंदेंना टोला
- Shivsena | “देवेंद्रजी, ५ वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले, तुम्ही असं करायला नको होतं”; खैरे संतापले
- Viral Video | कुत्र्याने केले वाघाला बेहाल, पाहा व्हिडिओ!
- Farming Update | मसूर मिश्र लागवडीवर शेतकऱ्यांना मिळू शकते भरघोस उत्पन्न