पुढील निकाल येईपर्यंत वाट पाहा विजय मल्ल्या

देशातील विविध बँकांचे कर्ज बुडवूनदेखील ब्रिटन न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर उद्योगपती विजय मल्ल्याने माध्यामांवर तोफ डागली आहे. भारतीय माध्यमे माझ्याविरोधात द्वेष पसरवत आहेत, असा आरोप मल्ल्याने ट्विटरवरून केला आहे.

‘भारतीय माध्यमे माझ्याविरोधात तीव्र द्वेष पसरवत आहेत. भारत सरकारने दाखल केलेल्या खटल्याचा निर्णय ब्रिटन कोर्टात होणार आहे. निर्णय येईपर्यंत वाट पाहा, असे मल्ल्या यांनी ट्विट केले आहे. मल्ल्याला लंडन न्यायालयाने 4 डिसेंबरपर्यंत जामिन मंजूर केला. विजय मल्ल्या याचे प्रत्यार्पण करण्यासंदर्भात भारत सरकारतर्फे लंडन न्यायालयात खटला सुरू असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 जुलैला होणार आहे. त्यामुळे विजय मल्ल्याला दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी 17 मेची सुनावणी पुढे ढकलत आज घेण्यात आली आहे.