fbpx

शरद पवारांच्या कृपेने मल्यांना दोन हजार कोटींचे कर्ज?

pawar mallya

टीम महाराष्ट्र देशा: फरार मद्यसम्राट विजय मल्याला दोन हजार कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्यासाठी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी तत्कालीन अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांच्याकडे रदबदली केल्याची माहिती चौकशी अहवालात असल्याचा दावा ‘रिपब्लिक टीव्ही’ या वृत्तवाहिनीने केला आहे .मल्याच्या थकलेल्या कर्जाची फेररचना करणाऱ्या बैठकीलाही पवार हे मुखर्जीसोबत उपस्थित राहिल्याचा दावा देखील या वाहिनीने केला आहे .

मद्यसम्राट विजय मल्ल्या ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनमध्ये पळून गेला आहे. या प्रकरणाचा सीबीआय व ईडी तपास करत आहे. चौकशीमध्ये तपास संस्थांना समजले आहे, की ६० टक्केहून अधिक बँकिंग व्यवहार वेगवेगळ्या देशांतून केले गेले आहेत. अनेक बँकांनी विजय मल्ल्याची विमान कंपनी घाट्यात होते त्यावेळी कर्ज दिले होते.

रिपब्लिक चॅनलने म्हटले आहे, की किंगफिशर कंपनीच्या आर्थिक आढावा बैठकीत शरद पवार उपस्थित होते. त्यावेळी ते कृषी मंत्री होते. या बैठकीत इकॉनॉमिक अॅडवायजरही उपस्थित होते. याचा खुलासा एसएफआयओ रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. एसएफआयओ रिपोर्टमध्ये याची माहिती ई-मेलच्या माध्यमातून देण्यात आली आहे. याची चौकशी करून अहवाल तयार करण्यात आला. पवार यांच्यावर लोन रिस्ट्रक्चरिंगबाबत लॉबिंग करण्याचा आरोप आहे. ‘अर्थमंत्र्यांशी पवारसाहेब बोलल्याचा’ आणि ‘पवारांच्या उपस्थितीतच अर्थमंत्र्यांनी किंगफिशर एअरलाइन्सच्या पाठीशी उभे राहण्याचा आदेश देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांना दिल्या’चा उल्लेख मल्यांच्या ई-मेल्समध्ये असल्याचा दावा ‘रिपब्लिक’ने केला. २००९मध्ये पवार हे कृषिमंत्री होते. त्यांचा अर्थ किंवा नागरी विमान वाहतूक मंत्रालयाशी संबंध नव्हता. मात्र, आयपीएलच्या निमित्ताने ते दोघे त्या काळात एकत्र होते. पवार हे बीसीसीआयचे अध्यक्ष, तर मल्याने त्यावेळी रॉयल्स चॅलेंजर्स बंगळूरु हा संघ विकत घेतला होता.