विजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा

टीम महाराष्ट्र देशा : पाच राज्यांपैकी तीन राज्यांमध्ये काँग्रेसच्या विजयानंतर पक्षाध्यक्ष राहुल गांधींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सगळीकडेच या विजयाचे श्रेय राहुल गांधींच्या नेतृत्वाला देत आहेत.

परंतु, या सर्वांमध्ये एका अशा व्यक्तीने सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, ज्याच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. त्या व्यक्तीचे नाव आहे विजय मल्ल्या. विजय मल्ल्याने आपल्या ट्विटरवरुन सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. मल्ल्याने काँग्रेस नेत्यांना दिलेल्या शुभेच्छांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राहुल गांधी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाहीत – शरद पवार