Vijay mallya- विजय मल्ल्या याला लंडनमध्ये अटक

हजारों कोटींचे कर्ज बुडवणा-या उद्योजक विजय मल्ल्या याला लंडन येथून अटक करण्यात आली आहे.

तो बॅंकांचे कर्ज बुडवून परदेशात पळून गेला होता. देशातील वेगवेगळ्या बँकांचे ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून विदेशात लपून बसला होता. आज त्याला कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे.

विजय मल्ल्यांविरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाईला सुरुवात करत आयडीबीयच्या 900 कोटीं कर्ज घोटाळ्यासंबंधी तपास करत असलेल्या ईडीने त्याची 1411 कोटींची मालमत्ता जप्त केली.