भारत – ऑस्ट्रेलिया सामना पाहण्यासाठी पळकुट्या मल्याने ओव्हलवर लावली हजेरी

टीम महाराष्ट्र देशा : इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर आज भारताचा विश्वचषकातील २ रा सामना ऑस्ट्रेलिया संघाबरोबर होत आहे. तर हा सामना पाहण्यासाठी पळकूटा विजय माल्या यांनी मैदानावर हजेरी लावली आहे.

भारतामध्ये बँकाना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून पसार झालेल्या विजय मल्ल्यानेही हजेरी लावली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने विजय मल्ल्याचे मैदानात जातानाचे फोटो शेअर केले आहेत.

यावेळी विजय मल्ल्याची प्रतिक्रीया घेण्यासाठी प्रसारमाध्यमांनी प्रयत्न केला. मात्र मी सामना पाहण्यासाठी आलो आहे, असं म्हणत मल्ल्याने अधिक काही बोलण्यास नकार दिला.