Share

Vijay Hazare Trophy : पुणेकर ऋतुराज गायकवाडचा कहर कायम !, उपांत्य फेरीत झळकावले सलग दुसरे शतक

Vijay Hazare Trophy | नवी दिल्ली : ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राने विजय हजार ट्रॉफी 2022 च्या उपांत्य फेरीत आसामचा पराभव केला. आता अंतिम सामन्यात त्यांचा सामना सौराष्ट्रशी होणार आहे. या सामन्यात पुन्हा एकदा ऋतुराजच्या बॅटने जोरदार पाऊस पाडला. उपांत्यपूर्व फेरीत द्विशतक झळकावल्यानंतर उपांत्य फेरीत शतक झळकावून त्याने आपल्या संघाला ३५० धावांपर्यंत मजल मारली. याला प्रत्युत्तरात आसामला निर्धारित 50 षटकांत केवळ 338 धावा करता आल्या. त्यामुळे महाराष्ट्राने 12 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या उपांत्य फेरीच्या सामन्यात आसामने नाणेफेक जिंकून महाराष्ट्राला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. महाराष्ट्राला राहुल त्रिपाठी (३) च्या रूपाने पहिला धक्का बसला, तर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या सत्यजित बच्छाव (४१) याने रुतुराज गायकवाडसोबत ६८ धावांची शानदार भागीदारी करून महाराष्ट्राला मजबूत स्थितीत आणले.

ऋतुराज गायकवाड (168) आणि अंकित बावणे (110) यांची फलंदाजी पाहून प्रेक्षक हैराण होते. दोन्ही फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी 207 धावांची मोठी भागीदारी केली. यादरम्यान अंकित आणि ऋतुराजचे शतकही पूर्ण झाले. त्यामुळे महाराष्ट्राने 7 गडी गमावून 350 धावा केल्या.

आसामला 50 षटकात 8 गडी गमावून केवळ 338 धावा करता आल्या. अशा प्रकारे महाराष्ट्राने प्रथमच विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.

महत्वाच्या बातम्या : 

Vijay Hazare Trophy | नवी दिल्ली : ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राने विजय हजार ट्रॉफी 2022 च्या उपांत्य फेरीत आसामचा …

पुढे वाचा

Cricket Marathi News Sports

Join WhatsApp

Join Now