‘कुशी’ चित्रपटाच्या शुटींग दरम्यान विजय देवरकोंडा आणि समंथा जखमी! कार पडली खोल पाण्यात
मुंबई : अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभू लवकरच कुशी या चित्रपटातून एकत्र दिसणार आहेत. सध्या ते काश्मीरमध्ये शुटींग करत आहेत. शुटींगमध्ये दोघेही जखमी झाल्याची बातमी समोर येत आहे. माहितीनुसार, स्टंट सीन च्या वेळी विजय आणि समंथा जखमी झाले आहेत. काश्मीरमधील पहलगाम भागात स्टंट सीन करत होते. हा सीन अवघड असल्यामुळे दोघांना दुखापत झाली आहे.
या सीनमध्ये लीडर नदीच्या काठावर दोरी बांधून दोघांना कारने जावे लागले. पण दुर्दैवाने कार पाण्यात पडल्यामुळे दोघांच्या पाठीला दुखापत झाली आहे. त्यांच्या बरोबर च्या व्यक्तींनी सांगितले की, त्याचवेळी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. आणि दोघांनीही परत रविवारी शूटिंग चालू केले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो दोघेही एकदम ठीक आहेत. शुटींगच्या वेळी कलाकारांच्या जवळ जाण्यास परवानगी नाही.
अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभू यांचा हा चित्रपट २३ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट तेलुगु, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये रिलीज होणार आहेत. विजय आणि समंथा २०१८ मध्ये ‘महानती’ या चित्रपटाच्या वेळी एकत्र दिसले होते त्यांनतर या चित्रपटाच्या वेळी एकत्र दिसले. शुटींग दरम्यान समंथाने काश्मीरमधील अनेक फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
महत्वाच्या बातम्या :