जेष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन

मुंबई : आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे जेष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं आज निधन झालं आहे, अस्वस्थ वाटू लागल्याने बुधवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुलुंडमधील फोर्टीस रुग्णालयात चव्हाण यांनी अखेरचा स्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीतील तारा निखळल्याची भावना व्यक्त करण्यात येतेय.

१९८५ साली वहिनीची माया या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. जवळपास ३५० ते ४०० चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली होती. विजय चव्हाण यांची मोरुची मावशी, श्रीमंत दामोदर पंत ही त्यांची नाटकं गाजली आहेत. जत्रा, घोळात घोळ, आली लहर केला कहर, माहेरची साडी, येऊ का घरात, झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत इत्यादी चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या.

चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार, तसेच राज्य सरकारचा पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.

 

एशियाड स्पर्धा : वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी त्यान रौप्य पदकाला घातली गवसणी