fbpx

महाराष्ट्र केसरी विजय चौधरी होणार पोलीस अधिकारी

ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी आता पोलीस अधिकारी होणार असून ते लवकरच खाकी गणवेशात दिसतील. वर्ग एकचे अधिकारी म्हणून ते शासकीय सेवेत रुजू होणार आहेत.  विजय चौधरी यांना लवकरच शासकीय सेवेत घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत जाहीर केले होते. विजय चौधरींना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या सर्व बाबींची पूर्तता झाली असून  कुठल्याही शिफारशीशिवाय आठवड्याभरात विजय चौधरींनी नोकरी देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.  विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही अभिनंदन प्रस्तावाला अनुमोदन दिले.