अण्णा हजारेंबददल दै.लोकपत्र मध्ये अवमानकारक भाषा; सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट

पारनेर /स्वप्नील भालेराव : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याविषयी नांदेड येथील दै. लोकपत्रमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तामध्ये अवमानकारक भाषा वापल्यामुळे पारनेर तालुक्यात त्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. आ. विजय औटी यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी शनिवारी सायंकाळी पारनेरचे पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांची भेट घेउन सबंधित संपादकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले.

ऑगस्ट 2011 मध्ये लोकपाल, लोकायुक्त कायदा करण्यासाठी देशातील जनआंदोलनामुळे जनतेने आपल्या नरेंद्र मोदी सरकारला सत्तेवर येण्यासाठी संधी दिली. त्या देशवासीयांची लोकपाल, लोकायुक्त सबंधाने चालढकल करणे योग्य नाही असे आम्हाला वाटते. हा मुददा हजारे यांच्या पत्रामध्ये आहे. त्याचा विपर्यास करून वैफल्यग्रस्त अण्णा हजारेंची निर्लज्ज कबुली अशा मथळयाखाली नांदेड येथील दै. लोकपत्र या वृत्तपत्राने माइ-या मुळेच मोदी, फडणविस सत्तेत, पण त्यांनी भ्रमनिरास केला. यापेक्षा काँग्रेसवालेच बरे होते, मी उगाच त्यांची निंदा नालस्ती केली. अशी वादग्रस्त विधाने हजारे यांच्या तोंडी घातली आहेत. हजारे यांच्या पत्रामध्ये असा कोणताही मजकुर नाही. असे असतानाही केवळ हजारे यांना बदनाम करण्यासाठी वृत्तपत्राचे संपादक रविंद्र तहकिक यांनी हा वादग्रस्त मजकुर प्रसिद्ध केला आहे.

यावेळी बोलताना आ. औटी म्हणाले, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याविषयी तालुक्यातील जनतेला आदर आहे. त्यांच्याविषयी अवमानकारक वृत्त छापण्यात आल्याने जनतेच्या भावना दुखावल्या असून पोलिसांनी सबंधित वृत्तपत्राचे मालक, मुद्रक व संपादकांना पारनेर येथे पाचारण करून त्यांची सखोल चौकशी करावी. त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. अशा प्रवृत्तींवर कारवाई न झाल्यास हजारे यांच्या समर्थकांच्या संतापाचा उद्रेक होउन मोठे आंदोलन उभे राहिल. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे असून पोलिसांनी योग्य खबरदारी घेण्याच्या सुचना आ. औटी यांनी केल्या. यावेळी आ. औटी यांच्यासह विश्वनाथ कोरडे, विकास रोहोकले, गणेश शेळके, अनिकेत औटी, डॉ. श्रीकांत पठारे, शाहीर गायकवाड, सुरेश पठारे, विजय वाघमारे, नंदकुमार देशमुख, मुदस्सिर सययद, शंकर नगरे, तुषार औटी, डॉ. संदीप औटी, डॉ. विनायक सोबले, दादा पठारे, गणेश कावरे, कल्याण थोरात, महेश गायकवाड आदी उपस्थित होते.

राळेगणसिद्धीतील ग्रामस्थांनी घेतला आत्मदहनाचा निर्णय