नवीन पाहुण्याच्या आगमनाची जोरदार तयारी ; पहा हरभजनच्या पत्नीचे बेबी शॉवर फोटो

gita basra

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरात नुकतेच नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. कोहली नंतर भारताचा टर्बनेटर माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगच्या घरीही दुसऱ्यांदा पाळणा हलणार आहे. क्रिकेटपटू हरभजन सिंगची पत्नी बॉलीवुड अभिनेत्री गीता बसराने सोशल मीडीयाद्वारे त्याच्या कुटुंबातील नव्या सदस्याचे स्वागत करण्यासाठी सज्ज असल्याची माहिती दिली होती. फक्त गीताच नव्हे, हरभजन सिंह आणि त्यांची मुलगीसुद्धा येणाऱ्या नव्या भावंडासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे.

 

दरम्यान, गीताच्या कुटुंबियांनी आणि मैत्रिणींनी मिळून तिच्यासाठी बेबी शॉवरचे आयोजन केले होते. गीताच्या मैत्रिणींनी तिला हे छानसं सरप्राईझ दिलं आहे. याचे काही फोटो गीताने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. या गीता निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. या ड्रेस मध्ये गीता अधिकचं सुंदर दिसत होती. गीताच्या मैत्रिणींनी या सोहळ्याला ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावली होती.

जुलै महिन्यात गीता आणि हरभजन त्यांच्या बाळाचं स्वागत करणार आहेत. तोवर ही जोडी दुसऱ्यांदा या आनंदपर्वातून जीवनाच्या एका नव्या प्रवासाचा अनुभव घेणार आहे. हरभजन आणि गीता बसरा यांनी २०१५ मध्ये लग्न केले होते. या दांपत्याला हिनाया नावाची एक मुलगी आहे. गीता बसराची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP