fbpx

#पहा_व्हिडीओ : पंतप्रधान नरेंद्र मोदीसमोरच त्रिपुराच्या मंत्र्याने ठेवला महिला मंत्र्याच्या कमरेवर हात

टीम महाराष्ट्र देशा – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देवही यांच्या समोरच त्यांच्याच मंत्रिमंडळातील एका मंत्राने महिलेला चुकीच्या पद्धतीने हात लावला. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेवरून विरोधकांनी त्या मंत्र्याच्या राजनाम्याची मागणी केली आहे.

सामाजिक कल्याण आणि शिक्षण मंत्री संताना चकमा यांच्या कमरेवर त्रिपुराच्या मंत्रिमंडळातील मनोज कांती देव यांनी चुकीच्या पद्धतीने हात ठेवला. यानंतर संताना चकमा यांनी लगेच मनोज कांती देव यांचा हात दूर केला असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

या सगळ्या प्रकारानंतर विरोधकांनी म्हटले आहे की, स्टेजवर देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री असताना देखील मनोज कांती देव यांनी अशा प्रकारचे महिला मंत्र्याबरोबर केलेले वर्तन अत्यंत चुकीचे आहे. त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे.

1 Comment

Click here to post a comment