विद्युत जामवाल आणि फॅशन डिझायनर नंदिताचा साखरपुडा; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

vidyut

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालचा फॅशन डिझायनर नंदिता मेहतानीसोबत नुकताच साखरपुडा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या साखरपुड्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, आता विद्युतने स्वत: सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

अनोख्या पध्दतीने साखरपुडा झाल्याने नेटकऱ्यांचे लक्ष वेधत आहे. विद्यतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दोन फोटो शेअर केल आहेत. या पैकी एका फोटोत विद्युत आणि नंदिता आर्मी कॅम्पमध्ये दीडशे मीटरच्या भिंतीवर चढताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत ते दोघेही प्रेमाच प्रतिक असलेल्या ताज महाल समोर आहेत. हे फोटो शेअर करत अशा पद्धतीने साखरपुडा केला. १ सप्टेंबर २०२१ असे कॅप्शन विद्युतने दिले आहे. या फोटोवर लाईक्स,कमेंटद्वारे शुभेच्छा येत आहेत.

दरम्यान, अशा चर्चा आहेत की नंदिता आणि विद्युतला पाच महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आता दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. नंदिता आणि विद्युत बऱ्याचवेळा एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायचे. मात्र, ते दोघे रिलेशनशिपमध्ये असतील याची कोणालाही कल्पना नव्हती. विदयुतने शेअर केलेल्या फोटोने नेटकऱ्यांचे लक्ष वेधत आहे.

महत्वाच्या बातम्या :