कोण आहे हा भिडे ? विद्या चव्हाण यांचा सवाल

टीम महाराष्ट्र देशा: आताच्या सरकारला जाती जातीत भांडण लावण्यास वेळ आहे पण शेतकऱ्याकडे पाहण्यास वेळ नाही असा टोला आमदार विद्या चव्हाण यांनी भाजप सरकारला लावला आहे. तसच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा जाती जातीत भांडण लावण्याचं काम या देवेंद्र फडणवीस सरकारने केल असल्याच देखील त्या म्हणाले. तर कोण आहे हा भिडे ? ही पेशवाई कोणासाठी काम करते ? असा सवाल विचारण्याची ही वेळ असल्याच त्या म्हणाल्या.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दुसऱ्या टप्प्यातील हल्लाबोल आंदोलनातील जाहीर सभेत त्या बोलत होत्या. राज्यातील भाजप सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या टप्प्यातील हल्लाबोल आंदोलनाला आजपासून सुरुवात झाली आहे. विनाअट आणि सरसकट शेतकरी कर्जमाफी, दूध आणि शेतीमालासाठी हमीभाव, विषारी औषध फवारणीमुळे बळी गेलेल्या शेतकरी कुटुंबियांना मदत, आरक्षण इत्यादी मागण्या या आंदोलनात करण्यात येत आहेत

विद्या चव्हाण याचं हे झंजावती भाषण पाहिलंत का ?Loading…
Loading...