fbpx

महापालिकेची यंत्रणा कंत्राटदारांकडून केवळ पाकिटे घेण्याचे काम करतेय का ? – विद्या चव्हाण

टीम महाराष्ट्र देशा : मुंबईत कधी भिंत कोसळून नागरिकांचा जीव जातो तर कधी गटारात वाहून नागरिक बेपत्ता होतात. त्यामुळे कामे करण्याऐवजी मुंबई महापालिकेची यंत्रणा कंत्राटदारांकडून केवळ पाकिटे घेण्याचे काम करतेय का? असा सवाल उपस्थित होतो. असा घणाघात राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी मुंबई महापालिकेवर केला आहे.

गोरेगावमधील दिव्यांश सिंह नावाचा एक दीड वर्षांचा चिमुकला नाल्यात पडून वाहून गेला. या घटनेनंतर आज मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांना स्थानिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. त्यानंतर महाडेश्वरांनी अशा घटनांना प्रशासनाप्रमाणे मुंबईकरही जबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली आहे.