मुंबई: राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकाच्या निकालावरून राजकारण चांगलेच रंगताना दिसून येत आहे. राजकीय क्षेत्रातील अनेक प्रतिक्रियांनी सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार पराभूत तर भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले आहे. या निवडणुकीवर अद्याप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणतेही विधान केले नाही. यावरूनच निलेश राणे यांनी त्यांना ‘मिस्टर इंडिया’ म्हणून डिवचले होते. यावरच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
“निलेश राणे कोण आहेत? आम्ही ओळखत नाही. अजित पवार सदैव काम करणारे नेते आहेत,” असे विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे. दरम्यान “अडचणीचे ढग दिसले की अजित पवार मिस्टर इंडिया सारखे गायब होतात. इतिहास सांगतो जेव्हा असामान्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा अजित पवार गुल पण बरं झालं अजित पवार यात पडले नाही कारण पहाटेच्या शपथविधीला त्यांच्यासोबत त्यांच्याच पक्षातले आमदार राहिले नाही ते बाहेरून आमदार कुठून आणणार.”, असा टोला निलेश राणे यांनी लगावला होता.
अडचणीचे ढग दिसले की अजित पवार मिस्टर इंडिया सारखे गायब होतात. इतिहास सांगतो जेव्हा असामान्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा अजित पवार गुल पण बरं झालं अजित पवार यात पडले नाही कारण पहाटेच्या शपथविधीला त्यांच्यासोबत त्यांच्याच पक्षातले आमदार राहिले नाही ते बाहेरून आमदार कुठून आणणार.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 12, 2022
दरम्यान राज्यसभा निवडणुकीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर टीका केली होती. काहीना ईडीची भीती तर काही जणांना वेगळी ताकद देऊन मत परिवर्तन केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता. यावरही निलेश राणे यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिले.
“राष्ट्रवादीचे राज्यपाल रोहित पवार यांची प्रतिक्रिया बघितली. राज्यपाल रोहित पवार यांनी आजोबांकडे लक्ष द्यावे कारण आजोबा नेमके काय करतात हे कोणालाच सांगत नसल्यामुळे तुमच्या बरोबर महाविकास आघाडीची पण अडचण झाली आहे.”, असा टोला निलेश राणे यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या:
- “जगात प्रत्येक गोष्ट कष्टाने कमवावी लागते”, ‘त्या’ वक्तव्यावरून चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना टोला
- “एक दिवस सत्य बाहेर येणार” ; सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
- “अशी भीक मागायची पद्धत बरी नव्हे…”, निलेश राणेंचा संजय राऊतांना टोला
- “..पण त्यामुळे आकाश कोसळले काय?”, आगामी विधान परिषद निवडणुकीवर संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
- IND vs SA 2022 : हेनरिक क्लासेनची ‘क्लास’ खेळी; दक्षिण आफ्रिकाचा ४ गडी राखून विजय