कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनच्या मुलीचा भाजपमध्ये प्रवेश

चेन्नई : तामिळनाडूतील कुख्यात चंदन तस्कर वीरपन्नची मुलगी विद्याराणीने भाजपत प्रवेश केला आहे. विद्याराणी या वकील आहेत. शनिवारी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस मुरलीधर राव यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला.यावेळी विद्याराणी यांच्याबरोबर त्यांच्या हजारो समर्थकांनीही भाजपत प्रवेश केला.

Loading...

पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व घेतल्यानंतर विद्या राव म्हणाली की, मी गरजू लोकांसाठी काम करेन, माझ्या वडिलांचा मार्ग चुकीचा होता परंतु त्यांनी नेहमीच गरीबांचा विचार केला. विद्या राणी वकील आहे. तिच्यासह हजारो समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. वीरप्पनवर चंदन तस्करी, अपहरण, खंडणीसारखे गंभीर गुन्हे होते. दक्षिण हिंदुस्थानात वीरप्पनचा चांगलाच दरारा होता. 18 ऑक्टोबर 2004 रोजी पोलिसांनी त्याला गोळ्या घालून ठार केले.

दरम्यान, एकेकाळी वीरप्पनने खूप मोठी दहशत निर्माण केली होती. कर्नाटक आणि तामिळनाडू शासनाला त्याने सळो की पळो करून सोडले होते. अखेर २००४ मध्ये पोलीस चकमकीत तो मारला गेला होता. तामिळनाडू, केरळ व कर्नाटक शासनाने त्याला पकडण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च केले होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात