पुणे : केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपच्या तब्बल ११६ खासदारांविरोधात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. यापैकी ८७ खासदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी माध्यमांसमोर मांडली. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत या विषयावर सविस्तर भाष्य केले. यावेळी त्यांच्यासह पुणे शहर उपाध्यक्ष रुपाली पाटील-ठोंबरे देखील उपस्थित होत्या. ज्या महिलांवर अन्याय झाला आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संपर्क साधावा, त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.
“मोदी सरकारच्या मागील आठ वर्षांच्या कार्यकाळात देशात महिला अत्याचार, बलात्कार, विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे आढळून आले आहे. यात महिला अत्याचार करणाऱ्या आरोपींमध्ये भाजप खासदार, आमदार व नेत्यांची यादी मोठी आहे. तसेच हे केवळ हिमनगाचे टोक आहे. भाजप सत्तेत आहे या धाकाने अनेक महिला गप्प असतील. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या योजनेसाठी मोदी सरकारने ४०१ कोटींची जाहीरातबाजी केली होती. त्याप्रमाणेच मोदी सरकार त्यांच्या पक्षातील नेत्यांनी केलेल्या अत्याचारांची माहितीही जाहीरातीद्वारे प्रसिद्ध करणार का”, असा सवाल देखील विद्या चव्हाण यांनी मोदी सरकारला विचारला आहे.
काय म्हणाल्या रुपाली पाटील-ठोंबरे
एखाद्या महिलेवर अन्याय झाला नसेल तरी त्याचा राजकीय कारणासाठी पूरेपूर वापर केला जातो. पण ज्या महिलांना न्याय मिळण्याची गरज आहे त्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळेच भाजप सत्तेत आल्यापासून आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट, अशी भाजपची भूमिका असल्याचा आरोप रुपाली पाटील-ठोंबरे यांनी केला.
महत्वाच्या बातम्या:
- Nilesh Rane | “उद्धव ठाकरेंना लॉलीपॉप चिन्ह द्या, धनुष्यबाण शोभणारं नाही”; निलेश राणेंची खोचक टीका
- Jayant Patil | “दिल्ली वाऱ्या व अंतर्गत मतभेदातून जर्जर…” ; OBC आरक्षणावरुन जयंत पाटलांचे शिंदे सरकारवर टीकास्त्र
- Ramdas Athawale | “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्या पक्षात आले तर…”; रामदास आठवलेंचं अजब विधान
- Uday Samant | लीलाधर ठाकरे यांचा शिवसेना वाढवण्यात सिंहाचा वाटा आहे – उदय सामंत
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदेंना घेरण्यासाठी गेम प्लॅन! १२ खासदारांना अपात्र करण्यासाठी याचिका
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<