विदर्भ आणि मराठवाडयात कृषी पंपांना वीज जोडणी देणार

new connection electric pump

विदर्भ आणि मराठवाडयात वर्षभरात ८० हजार ७२९ कृषी पंपांची जोडणी करण्यात येणार आहे. वीज जोडण्याच्या कामासाठी महावितरण कंपनीला आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याच्या महावितरणच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. विदर्भ आणि यात2017-18 च्या अर्थसंकल्पात कृषी पंप प्रादेशिक असमतोल दूर करणे यासाठी 916.20 कोटीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. यापैकी रू. 421 कोटी ची तरतूद उपलब्ध आहे. या विशेष योजनेसाठी सन 2017-18 या वर्षाकरिता आणखी आवश्यक असलेला 495.46 कोटी हा अतिरिक्त निधी देण्याची मागणी ऊर्जा विभागाने केली होती. त्या मागणीला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. महावितरण 2016-17 या वर्षाकरिता विदर्भ मराठवाडयातील कृषी पंप जोडणीसाठी 916.20 कोटींची मागणी केली होती.2017-18 साठी 421 कोटी अर्थसंकल्पात तरतूद करून मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर महावितरण कंपनीस वितरित करण्यात येतील. उर्वरित 495.46 कोटी रूपये अतिरिक्त नियतव्यय मंजूर करण्यात येणार आहेत. राज्यात मार्च 2017 अखेर 2 लाख 5 हजार 590 अर्जदारांनी कृषी पंप वीज जोडणीसाठी पैसे भरले आहेत. त्या शेतकऱ्यांना वीज जोडण्या देण्यात येतील