नागपुरात मुसळधार पावसामुळे विधिमंडळाची बत्ती गुल; कामकाज ठप्प

नागपूर : तब्बल ४२ वर्षानंतर नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशन होतं आहे. मात्र शहरात होतं असलेल्या मुसळधार पावसामुळे विधिमंडळाचे कामकाज बंद ठेवण्याची नामुष्की सरकारवर ओढवली असून, यामुळे पुन्हा एकदा सरकारचा नियोजनशून्य कारभार चव्हाट्यावर आला आहे.पावसाळी अधिवेशन हे मुंबईतचं घ्यावं यासाठी विरोधक आग्रही होते. मात्र मुंबईमध्ये आमदार निवासाचं बांधकाम सुरु असल्याने हे अधिवेशन नागपूरलाचं होणार असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.

मात्र नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशन घेण्यापूर्वी सरकारने कुठलीही पूर्व तयारी केली नसल्याचं आता समोर आलं आहे. यावरून विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.नागपुरात मुसळधार पाऊस कोसळतोय, नागपूरच्या रस्त्यांवर गुढघाभर पाणी साचलं आहे. आम्हाला देण्यात आलेली निवास्थाने देखील गळू लागली आहे. पावसामुळे नागपूरचा वीजपुरवठा खंडित झाल्याने, विधिमंडळात देखील वीज नाहीये. त्यामुळे विधिमंडळाचे कामकाज बंद ठेवावे लागले आहे. सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे इतिहासात हे पहिल्यांदाच घडत असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केलाय.

ते पुढे बोलताना म्हणाले आहेत की, ज्याप्रमाणे हे सरकार राज्यातील जनतेबाबत गंभीर नाहीय. त्याचप्रमाणे हे सरकार अधिवेशनाबाबत देखील गंभीर नसल्याचं दिसून येत आहे. नागपूरला कुठलीही पूर्वव्यवस्था न करता हे अधिवेशन घेण्यात येतं आहे यातून सरकारचा ढिसाळ कारभार दिसून येत असल्याची टीका त्यांनी केलीये.

सत्ताधारी पक्षच जाणीवपूर्वक सभागृहाचे कामकाज बंद पाडतात

हा तर धनंजयवर अन्याय! शरद पवारांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण