चार आमदारांचे राजीनामे मंजूर, विधानसभेत भाजप – शिवसेनेचे संख्याबळ घटणार

maharashtra vidhansabha

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या चार आमदारांचे राजीनामे मंजूर करण्यात आले आहेत, यामध्ये शिवसेनेच्या तीन तर भाजपच्या एका आमदाराचा समावेश आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी राजीनामे मंजूर केल्याने विधानसभेत भाजप – शिवसेनेचे संख्याबळ घटणार आहे.

शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवर राजीनामा दिला होता, जाधव यांनी बंडखोरी करत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक देखील लढवली आहे. शिवसेनेचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेडमधून भाजपच्या तिकिटावर लोकसभा लढवली, तर निवडणुकीपूर्वी सुरेश धानोरकर यांनी सेनेला जय महाराष्ट्र केला आहे.

भाजपचे धुळ्याचे आमदार असणारे अनिल गोटे यांनी देखीलं बंडखोरी करत केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली आहे. महाराष्ट्र विधनासभा आणि परिषदेतील १५ आमदार लोकसभेच्या मैदनात उतरले आहेत, यामध्ये चार जणांनी राजीनामा दिला. शिवसेनेचे संख्याबळ आता ६३ वरून ६० वर तर भाजपचे १२२ वरून १२१ वर येणार आहे.

लोकसभा निवडणूक लढवलेली महाराष्ट्रातील आमदार
भाजप : गिरीश बापट

शिवसेना : हेमंत पाटील

Loading...

राष्ट्रवादी कॉंग्रेस
राणा जगजितसिंह पाटील
संग्राम जगताप

कॉंग्रेस
कुणाल पाटील
के सी पाडवी
भाऊसाहेब कांबळे

Loading...

बीआरपी : बळीराम सिरकर

Loading...

एमआयएम :  इम्तियाज जलील

भाकप – जीवा पांडू गावित