fbpx

दुसऱ्यांच माहित नाही आम्ही मात्र स्वतःच्याचं चिन्हावर लढणार – महादेव जानकर

महादेव जानकर

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वतःच्या चिन्हावरच लढणार असल्याची माहिती मिळत आहे. ‘आम्ही एनडीएचे घटक पक्ष असलो तरी कमळावर विधानसभा लढण्यास तयार नाही. इतर घटक पक्षांची भूमिका माहिती नाही, पण रासप स्वतःच्या चिन्हावर लढण्यावर ठाम असल्याचं रासपचे अध्यक्ष आणि मंत्री महादेव जानकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

दरम्यान,जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील घटक पक्षांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी अशी इच्छा असल्याचं म्हटलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घटक पक्षांशी चर्चा करून निर्णय घेतील असं देखील गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाजपचा नेमका प्लॅन काय? याबाबत आता चर्चा सुरू झाल्या आहेत.

तर दुसरीकडी भाजपचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी युतीतील जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. त्यानंतर युतीत धुसफूस सुरु झाली. चंद्रकांत पाटलांच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार, 288 पैकी 18 जागा मित्रपक्षांना, तर बाकी सेना आणि भाजपमध्ये समान जागावाटप होईल असं ते म्हणाले होते. पण आमचा कोणीही मित्रपक्ष नाही त्यामुळे २८८ पैकी प्रत्येकी 144 जागा दोघांच्या वाट्याला याव्यात, अशी अपेक्षा शिवसेनेची आहे. तुमच्या मित्रपक्षांना तुमच्या वाट्यातून जागा द्या अशी भूमिका शिवसेनेनी मांडली आहे.