चंद्रकांत पाटील म्हणतात, आता विधानसभेसाठी बारामतीमध्ये तळ ठोकणार

ajit pawar vr chandrakant patil

टीम महाराष्ट्र देशा : आजवर बारामती मतदारसंघात पक्ष बांधणीवर लक्ष दिले गेले नाही, मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील काही महिने बारामतीमध्ये तळ ठोकणार आहे, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. पाटील यांनी लोकसभे पाठोपाठ विधानसभेसाठी देखील पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचा गड असणाऱ्या बारामतीमध्ये भाजपने लोकसभा निवडणुकीत चांगला जोर लावला आहे, कांचन कुल यांना मैदानात उतरवत सुप्रिया सुळे यांना आव्हान देण्यात आले आहे. दरम्यान आता विधानसभा निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शह देण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी आपण स्वतः बारामतीला नियमित जाऊन पक्षाचा विस्तार व ताकद वाढविण्याचे काम करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.