संग्राम जगतापांच्या विरोधात स्वपक्षातील नेत्यानेच थोपटले दंड, नगरमध्ये राष्ट्रवादीत यादवी ?

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांनी नगर शहरातून आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. शहराचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना डावलून त्यांना उमेदवारी देण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. ‘राष्ट्रवादी’च्या प्रदेशस्तरीय नेत्यांकडे उमेदवारीची मागणी करणार असल्याचे त्यांनी म्हंटले. किरण काळे हे ‘राष्ट्रवादी’च्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यात सक्रिय आहेत त्यामुळे त्यांचा पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर संपर्क आहे.

आगामी विधानसभा निवडणूक आवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणूक पार पडली. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्कादायक पराभव पत्कारावा लागला आहे. विधानसभेतही तसाच पराभव पत्करावा लागू नये म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसने मोर्चे बांधणी सुरु केली आहे. मात्र पक्षातील आपसी मतभेत काय रंग दाखवतील हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Loading...

नगर शहराचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांनी टीका केली आहे तसेच त्यांच्याविरोधात जनआंदोलनही सुरू केले आहे. इतकेच नव्हे तर, नगर शहरातून आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.  २०१४च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी पक्षाकडे शहरातून लढण्याची परवानगी मागितली होती. त्या वेळी जगताप समर्थक व काळे समर्थकांमध्ये वादही झाले होते. मात्र त्यावेळी काळें ऐवजी जगतापांना उमेदवारी देण्यात आली होती. आणि त्यांनी विजयही मिळविला होता. या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आमदार जगताप यांचा पराभव झाल्याने व त्यांचा मतदारसंघ असलेल्या नगर शहरातूनच ते तब्बल ५३ हजार मतांनी पिछाडीवर पडले असल्याने काळे यांनी पुन्हा शहरातून लढण्याची तयारी सुरू केली आहे. तशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.

इतकेच नव्हे तर, ३० वर्षांपासून शहर विकासापासून वंचित आहे, शहरात गुंडाराज असून, बेरोजगार तरुण पिढीला आयुष्य उद्ध्वस्त करणारा गुन्हेगारी स्वरूपाचा रोजगार देण्यात काही नेत्यांना धन्यता वाटते. अशा प्रवृत्तीमुळे नगरची राज्यभर बदनामी झाली आहे. असा टोलाही त्यांनी जगताप यांचे नाव ण घेता लगावला आहे.  तसेच शहरातून विधानसभा निवडणूक लढवणार आहे आणि जनदोलनाच्या माध्यमातून नगरकरांसमोर शहर विकासापासून वंचित राहिल्याची वस्तुस्थितीही मांडणार आहे. ‘लोकसभा निवडणुकीत जगतापांचा पराभव का झाला, याचा वस्तुनिष्ठ अहवाल पक्षाच्या मुंबईत होणाऱ्या श्रेष्ठींच्या बैठकीत आपण मांडणार असल्याचेही काळे यांनी माध्यमांशी बोलताना म्हंटले.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात