विधानपरिषदेच्या ६ जागांसाठी २४ मे रोजी मतदान

टीम महाराष्ट्र देशा : स्थानिक स्वराज्य संस्थामधून विधानपरिषदेसाठी निवडूण देण्यात येणा-या ६ जागांसाठी येत्या २४ मे ला मतदान होणार आहे. तर मतमोजणी २४ मे ला होणार आहे. त्याबाबतची अधिसुचना निवडणूक आयोगाने काढली आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था, कोकण स्थानिक स्वराज्य संस्था, परभणी हिंगोली, लातूर – बीड – उस्मानाबाद, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर- गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे.

या सहा जागांसाठी होणार मतदान

जयवंत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस – नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था

अनिल तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस – कोकण स्थानिक स्वराज्य संस्था

बाबाजानी दुर्रानी, राष्ट्रवादी काँग्रेस – परभणी – हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था

दिलीपराव देशमुख, काँग्रेस – उस्मानाबाद, बीड, लातूर स्थानिक स्वराज्य संस्था

प्रविण पोटे-पाटील, भाजप – अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था

मितेश भांगडीया, भाजप – वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था

You might also like
Comments
Loading...