कर्जत जामखेड रंगणार सुजय विखे वि. रोहित पवार असा सामना

blank

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड मतदार संघातून भाजप उमेदवार राम शिंदे यांना विजय मिळवून देणार असल्याचा विश्वास आज नगरचे खा. डॉ. सुजय विखे यांनी एका कार्यक्रमात बोलून दाखवला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेडमध्ये हाय व्होल्टेज लढत पाहिला मिळणार आहे. कारण कर्जत जामखेड मधून शरद पवार यांचे दुसरे नातू रोहीत पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात युतीकडून राम शिंदे यांना उतरवणार असल्याचं दिसत आहे.सुजय विखे यांनी एका आयोजित कार्यक्रमात शिंदेंच्या विजयाबाबतचे भाष्य केले आहे.

वास्तवात लोकसभेत खुद्द सुजय विखे यांनाच या मतदारसंघातून अल्पमत मिळाले होते. मात्र विधानसभेत भाजपला यश मिळणारच असा विश्वास सुजय विखे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी सुजय विखे म्हणाले की, कर्जत जामखेडच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. अनेक विकासकामे केली. तरी देखील आपल्याला येथून आघाडी मिळाली नाही, हे एक कोडं असल्याचे विखे यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी याचे कारणही सांगितले. राम शिंदे हे केलेल्या कामाची प्रसिद्ध करण्यात कमी पडले. त्यामुळेच कदाचित आपल्याला कर्जतमधून लीड मिळाली नसावी. मात्र आगामी काळात त्यांनी केलेली कामे गोरगरिबांपर्यंत पोहचतील, असही विखे यांनी म्हटले.

दरम्यान रोहित पवार यांनी पक्षश्रेष्ठींकडे कर्जत जामखेडच्या उमेदवारी साठी अर्ज केला आहे. तर राष्ट्रवादी कडून देखील रोहित पवार यांच्या नावावर शिकामोर्तब होणार असल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे भाजप कडून राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. तर शिंदेंच्या याच्या विजयच्या जबाबदारी सुजय विखे यांनी उचलली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेडची लढत लक्षवेधी ठरणार आहे.