विधानपरिषद निवडणूक: नारायण राणेंना गाजरच; भाजपची उमेदवारी प्रसाद लाड यांना

टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणारे प्रसाद लाड यांना विधानपरिषद उमेदवारीची लॉटरी लागली आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मात्र तूर्तास तरी शांत बसाव लागणार आहे. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास प्रसाद लाड उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर कॉंग्रेसकडून सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी देण्यात आलीय. दरम्यान शिवसेनेकडूनही लाड यांना पाठींबा देण्यात आला आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कॉंग्रेस सोडताना राजीनामा दिल्याने विधानपरिषदेची जागा रिक्त झाली होती. दरम्यान राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करत एनडीएला पाठींबा दिला होता. त्यामुळे भाजपकडून त्यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याच मानल जात होत. मात्र शिवसेनेचा कडवा विरोध, हिवाळी अधिवेशन आणि गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.