सेना – भाजप युती नंतर आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी

congress ncp

टीम महाराष्ट्र देशा : स्थानिक स्वराज्य संस्थामधून निवडल्या जाणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी, अखेर काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी केली आहे. उस्मानाबाद-बीड-लातूरच्या जागेवरुन आघाडी अडली होती, मात्र ती जागा जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्याने आघाडी झाली आहे.

नव्या समीकरणानुसार कोकण, नाशिक आणि लातूर या तीन जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्या आहेत, तर अमरावती, चंद्रपूर आणि परभणी या जागांवर काँग्रेस उमेदवार देईल.