विधान परिषद पोटनिवडणुकीत प्रसाद लाड यांची बाजी; काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते फुटली

मुंबई: विधान परिषदेच्या आज झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रसाद लाड हे विजयी झाले आहेत. प्रसाद लाड यांना 209 मते मिळाली. तर दिलीप माने यांना 73 मते मिळाली. यामध्ये दोन मते बाद झाली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते मोठ्या प्रमाणात फुटली आहेत.एकूण संख्याबळ पाहता प्रसाद लाड यांचा विजय निश्चित मानला जात होता.

आज झालेल्या मतदानात विधानसभेच्या 288 पैकी 284 आमदारांनी मतदान केलं. एमआयएमच्या दोन आमदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला.