किरीट सोमय्या यांच्या एकनिष्ठतेवर प्रश्न उपस्थित करणारा व्हिडिओ व्हायरल

kirit somaya

टीम महारष्ट्र देशा :निवडणुका आल्या की फेक व्हिडीओ आणि ऑडीओ क्लिप व्हायरल होणे हे काही नवीन नाही. पण आता भाजप चे एकनिष्ठ नेते किरीट सोमय्या यांच्या एकनिष्ठेवर प्रश्न उपस्थित करणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दीना पाटील यांना सोमय्या पाठिंबा देत असल्याच दिसत आहे. तर ‘भाऊ माझ्यापेक्षा जास्त काम करतो’, अशा प्रकारचं विधान या व्हिडीओत किरीट सोमय्या करताना दिसत आहेत. मात्र हा व्हिडीओ एडीट केलेला म्हणजेच बनावट असल्याच निदर्शनास आल आहे.

यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगा कडे तक्रार केली आहे तर पोलीस सायबर सेलकडे देखील धाव घेतली आहे. या घटनेवर किरीट सोमय्या म्हणाले की, अशा प्रकारचे व्हिडीओ व्हायरल करुन राष्ट्रवादीने भ्रमात राहू नये. २९ तारखेला जनता तुमचा भ्रम मोडून काढेल, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

दरम्यान ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघामधून किरीट सोमय्या याचं तिकीट कापत भाजपने मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या आता मतदार संघामध्ये भाजप उमेदवार मनोज कोटक यांचा प्रचार करत आहेत. त्यावेळी प्रचार करताना किरीट सोमय्या यांनी केलेल्या विधानाची व्हिडीओ क्लिप एडिट करुन किरीट सोमय्या हे राष्ट्रवादीच्या उमेदवार संजय पाटील यांचा प्रचार करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वर व्हायरल केला गेला आहे.

Loading...