मुंबई : आयपीएल २०२२ नंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती, त्यात माजी कर्णधार विराट कोहली, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीसह अनेक दिग्गज खेळाडूंच्या नावाचा समावेश होता. यादरम्यान टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० मालिका खेळली जात आहे, ज्यामध्ये ऋषभ पंतकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा यंदाचा आयपीएल हंगाम खूपच खराब गेला, पण आयपीएलनंतर तो कुटुंबासोबत सुट्टी साजरी करताना दिसला.
कुटुंबासोबत सुटी साजरी केल्यानंतर त्याने इंग्लंड दौऱ्याची तयारी सुरू केली आहे मात्र त्याआधी तो मुंबईच्या रस्त्यांवर क्रिकेट खेळताना दिसला. त्याच्या एका चाहत्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे, ज्यामध्ये रोहित शर्मा मुंबईच्या वरळी भागात स्ट्रीट क्रिकेट खेळत आहे आणि यादरम्यान त्याने एक लांब षटकारही मारला आहे. रोहित शर्माचा स्ट्रीट क्रिकेट खेळण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Rohit Sharma playing gully cricket at Worli, Mumbai ahead of the England tour. pic.twitter.com/XeZrDL53ii
— Sanskruti Yadav (@SanskrutiYadav_) June 15, 2022
२०२२च्या सुरुवातीला टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीने सर्व फॉरमॅटमधून कर्णधारपद सोडले होते, त्यानंतर रोहित शर्माची टीम इंडियाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने यावर्षी सर्व सामने जिंकले असून इंग्लंड दौऱ्यावरही त्याच्या नेतृत्वाखाली संघ चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मागील वर्षीचा कसोटी मालिकेतील शेवटचा कसोटी सामना १ जुलैपासून सुरू होणार आहे. टीम इंडिया मालिकेत २-१ने आघाडीवर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –