fbpx

मळ डबल ! आफ्रिदीचा तंबाखू खातानाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल

टीम महाराष्ट्र देशा – शाहिद आफ्रिदी हा अनेक क्रिकेटप्रेमींचा आदर्श आहे हे आपण सर्वच जाणतो .मात्र पाकिस्तानचा हा स्टार क्रिकेटर सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाण्याच्या कारणामुळे एका नव्या वादात सापडला आहे.

दरवर्षी ६ सप्टेंबरला पाकिस्तानमध्ये सुरक्षा दिवस साजरा केला जातो. यानिमित्त यंदा आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीलाही आमंत्रण देण्यात आले होते. हा कार्यक्रम सुरु असतानाच त्याने तंबाखू खाल्ली. ही गोष्ट कॅमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. आफ्रिदीच्या या वर्तनामुळे सध्या तो टीकेचा धनी बनला आहे.सोशल मिडीयावर त्याच्यावर वर सडकून टीका केली जात आहे.